थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) थेऊर येथील गावातील रस्त्याचे काम चालू असल्याने लोणीकंद थेऊरफाटा या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त श्रीरामे यांनी वाहतूक शाखेच्या लोणीकंद तसेच लोणी-काळभोर शाखेला लेखी सूचना देऊन देखील या मार्गावर अनेक अवजड वाहने येत असून यामुळे गावातील अरुंद रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे या जड वाहतुकीस परवाणगी कशी मिळते वरिष्ठाच्या सूचनेची अवहेलना होताना दिसत आहे.

थेऊरफाटा लोणीकंद रस्त्याचे अष्टविनायक रस्ते प्रकल्पा अंतर्गत काम चालू असून जवळपास सर्वच टप्प्यातील काम पूर्णत्वास आले आहे केवळ थेऊर गावातील सहाशे मिटर रस्त्यावर सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम आणि बकोरीफाटा येथील थोडे काम शिल्लक आहे यापैकी थेऊर गावातील काम चालू असून यासाठी या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे परंतु अनेक हायवा मोठे मालट्रक विनादिक्कत येत आहे सध्या ही वाहतूक गावातील अरुंद रस्त्याने वळविण्यात आली आहे.त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

यावर रस्त्यावरील काम करणाऱ्या ठेकेदाराकडून वाहतूक नियंत्रण करण्यासाठी जबाबदारी सोपविलेल्या व्यवस्थापकाशी संपर्क केला असता त्यांनी वाहतूक पोलीस ही वाहतूक नियंत्रीत करत आहेत असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *