थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) थेऊर येथील महावितरण कार्यालयात गेली एक महिन्यापासून अधिकाऱ्याची प्रतिक्षा असून केवळ कुंजीरवाडीतील काळजीवाहू अधिकारी दूरध्वनीवर येथील कारभार सांभाळत असल्याने अनेक नागरिकांची कामे खोळंबून पडली आहेत.
गेल्या महिन्यात थेऊर येथील महावितरणच्या अधिकाऱ्यावर कारवाई केली त्यामुळे येथील कार्यालयाचा अतिरिक्त भार कुंजीरवाडीतील अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला थेऊर येथील त्यानंतरची ग्राहकांना विज मंडळाकडून सेवेसाठी अडचणी वाढत गेल्या येथील विज कर्मचारी कुठे काय काम करतात यावर दूरध्वनीवरुनच लक्ष ठेवले जात आहे.कोणता कामगार कामावर आहे कोण सुट्टीवर आहे हे देखील कार्यालयात येऊन तपासले जात नाही.
याच कालावधीत गावात अनेक ठिकाणी विज वहनात कमी अधिक दाब निर्माण झाल्याने अनेक ग्राहकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले तर विजेचा लपंडाव चालूच आहे सततच्या या लपंडावामुळे घरगुती विज उपकरणे वापरावीत की कायमची बंद ठेवावीत असा सवाल नागरिक विचारत आहेत. कारण यामुळे ही उपकरणे बिघडण्याचा धोका निर्माण होतो महागडी उपकरणे बंद पडल्यानंतर ती दुरुस्तीचा खर्च मोठा असतो.
