पुणे ( हवेलीनामा आॕनलाईन) पुणे येथील हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन ही संस्था समाजातील गरीब व गरजु नागरिकांना काही अडचणीच्या आजारावर मार्गदर्शन पर शिबीर तसेच उपचार शिबीर आयोजित करते यातून अनेकांना लाभ मिळाला आहे.देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी अशा मोफत शिबीराचे आयोजन करण्यात येत आहेत.

अशाच एका शिबीराचे आयोजन वृद्ध मित्र स्कूल संस्था व हीलींग हँड्स फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर जनवाडी येथे तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने करण्यात आले होते.

हिलींग हँडस फाउंडेशन तर्फे डॉ आदिती मुधोलकर यांनी रुग्णांची तपासणी केली आहार कसा असावा याविषयी माहिती दिली , तेजश्री खलाटे यांनी समुपदेशन केले व औषधे दिले,आनंद मिसाळ,आशना तांबोळी यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.

वृद्ध मित्र ,स्कूल संस्थे कडून अनुप्रिता दीक्षित (सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर),सुशील माने (प्रोजेक्ट मॅनेजर),लक्ष्मीकांत बावकर (प्रोजेक्ट कॉर्डिनेटर),सुजाता विटकर (कम्युनिटी ऑफिसर) यांचे देखील मार्गदर्शन लाभले.

या शिबिरात 75 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.अनिता सैद (शिबीर व कार्यक्रम व्यवस्थापक)यांनी शिबिराचे पूर्ण नियोजन केले, व शिबिरास सौ.मधुरा भाटे (संस्था समन्वयक) यांचे मार्गदर्शन लाभले.

या आजरांविषयी योग्य माहिती व मार्गदर्शन गावोगावी पोहोचवण्याचा डॉ अश्विन पोरवाल (अध्यक्ष, हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन ) यांचा प्रयत्न चालूच राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *