थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) राज्य शासनाच्या आदेशानुसार आज राज्यात सर्वत्र सकाळी अकरा वाजता सामुहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले याला पूर्व हवेलीतील गावात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले अनेक नागरिकांनी आहे त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत गायीले.यात कोणी रस्त्यावर उभे राहून तर कोणी बाजारपेठेत उभे राहून यात सहभाग घेतला.
तसेच प्राथमिक शाळा माध्यमिक विद्यालये महाविद्यालयातही सामुहिक राष्ट्रगीत म्हटले गेले.थेऊर येथील चिंतामणी विद्यामंदीर येथे मैदानात शिक्षक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायीले.तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील यात सहभाग घेतला.

सर्व शासकीय कार्यालयात कर्मचारी अरोग्य विभागातील अरोग्य कर्मचारी आशा सेविका,अंगणवाड्यातील अंगणवाडी सेविका विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.
राज्य शासनाने या सामुहिक राष्ट्रगीत गायनाचे आवाहन केले होते याला आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला.
