थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी स्वातंत्र्य विरांनी आपले बलिदान दिले तर त्याकाळात वृत्तपत्रांनीही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली व आपला देश स्वतंत्र झाला लोकशाही मुल्य रचनेवर उभारलेल्या देशाच्या एकसंघतेची जबाबदारी आपल्या खांद्यावर देत लोकशाही संमृध्द करण्याचा वारसा दिला आहे.घटनाकारांनी लोकशाही भक्कम करण्याची जबाबदारी प्रशासना बरोबरच समाजसेवी संस्था व प्रसार माध्यमांवर सोपवली आहे व ती त्यांनी योग्य प्रकारे पार पाडावी असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी प्रतिपादन केले.

थेऊर येथील ग्रामपंचायत सभागृहात रेखा दिलीप लगड बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हवेली व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून समाजाला सेवा पोहोचवणाऱ्या विज कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका,निवृत्त सैनिक यांना संपूर्ण पोषाख देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी बोलत होते.यावेळी गुन्हे शोध पथकाचे पोलिस अधिकारी सत्यम गाडे,पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, उद्योगजक सुभाष कुंदेन, पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर, पञकार संघाचे अध्यक्ष सिताराम लांडगे,महिला आघाडीच्या शशिकला वाघमारे, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष मारुती कांबळे, ग्रामपंचायत सदस्य गौतमी कांबळे, पोलिस पाटील रेश्मा कांबळे,सारिका भिसे,गोविंद तारु,हभप संपत बिनावत,आरोग्य अधिकारी शिल्पा दलाल,पञकार संघाचे तालुका अध्यक्ष पंढरीनाथ नामगुडे कार्याध्यक्ष तुषार काळभोर,सरचिटणीस दिगंबर जोगदंड,विजय रणदिवे,राम भंडारी,अमन शेख, राष्ट्रवादीचे लक्ष्मण चव्हाण, रेखाताई लगड बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष दिलिप लगड,संतोष ओव्हाळ,राहुल गायकवाड उपस्थित होते.

यावेळी रेखा दिलीप लगड बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सातारा येथे सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करणा-या सत्यम फाऊंडेशन या सामाजिक संस्थेस पन्नास हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *