थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिरात यावेळी श्रावण महिन्यात वेगवेगळ्या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन श्रींची आरास केली जात आहे यात सोमवार नागपंचमी राखी पौर्णिमा यादिवशी तशी आरास करण्यात आली जी भक्तांमध्ये एक वेगळेपणाचा भाव निर्माण करुन जात आहे असाच आपल्या देशाच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचा नकाशा व स्वातंत्र्य दिनी तिरंग्या ध्वजाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.

श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीची आराधना संपूर्ण महाराष्ट्रात केली जाते यावेळी हा योग स्वातंत्र्यदिनी आला.यामुळे अष्टविनायकापैकी पाचवा गणपती असलेला थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती होय पुणे शहरालगत असल्याने भाविकांची मोठी गर्दी असतेच परंतु देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन असल्याने सकाळी मंदिरात भाविकांची संख्या कमीच होती अनेकांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूनच घराबाहेर पडणे पसंत केले.वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात हजेरी लावून ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

चिंतामणी मंदिराचे पुजारी आगलावे बंधू हा दिनविशेष उपक्रम राबवत असल्याचे दिसून आले.

संकष्टी चतुर्थी असल्याने विशेषतः सुट्ट्यांचा कालावधी असल्याने गर्दी होणार त्यामुळेच लोणी-काळभोर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला,थेऊर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, पोलीस हवालदार नरेंद्र सोनवणे,विजय जाधव,दिगंबर जगताप, पोलीस नाईक विशाल बनकर आदींनी चोख नियोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *