लोणी-काळभोर (हवेलीनामा ऑनलाईन) अलिकडे घरातील आजारी व्यक्तीच्या बद्दल संवेदनशीलता हळूहळू कमी होताना दिसत असून अशा खाटेवर खिळून असलेल्या व्यक्ती बेवारसपणे निर्जन ठिकाणी टाकून देण्याच्या घटनेत वाढ होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे क्रियाशील सदस्य राम भंडारी,अमन शेख दिगंबर जोगदंड व अमोल खोले यांनी अशा नातेवाईकांना आवाहन केले आहे की जर आपण अशा जबाबदाऱ्या पार पाडण्यात असमर्थ असाल तर अशा आजारी माणसांच्या आजारपणाची जबाबदारी आम्ही आमची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ उचण्यास समर्थ आहे.

भारतीय संस्कृतीत सेवेला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे आपण आपल्या आप्तेष्टांची तर सेवा करतोच परंतु एखादा अनोळखी जरी अडचणीत असेल तर आपण धाऊन जातो.पण अलिकडे ही आत्मियता कमी होऊ लागल्याचे जाणवते आहे.गेल्या काही दिवसात लोणी-काळभोर परिसरात घरातील आजारी व्यक्ती अपरात्री निर्जन स्थळी टाकून आपली त्यापासून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न होत आहे अशा काही घटनात समाज कार्यात कायम अग्रभागी असणार्या राम भंडारी यांना येत आहे.त्यांनी अरोग्य विभाग रुग्णवाहिकेचे चालक शानू आत्तार व पोलीस प्रशासनातील पोलीस कर्मचारी इश्वर भगत,घनश्याम कुमार आडके यांच्या मदतीने अशा आजारी व्यक्तींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

तर खरोखरच आपली अर्थिक परिस्थिती नसेल व घरात एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्यांनी निःसंकोचपणे आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे यासाठी संपर्क क्रमांक : 9373408989 यावर संपर्क करावा.
