पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) हडपसर पोलीस स्टेशनमध्ये एका तक्रारदाराचे अर्थिक व्यवहारातील येणे पैसे मिळवून देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक याने पन्नास हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नुकतीच कारवाई करण्यात आली असून त्या उपनिरीक्षकास लाच स्विकारताना अटक करण्यात आले आहे.
लोकसेवक सागर दिलीप पोमण हे हडपसर पोलीस स्टेशनमध्ये कार्यावर आहेत.त्यांनी हडपसर पोलिसात दाखल असलेल्या एका तक्रारदाराचे अर्थिक व्यवहारातील पैसे मिळवून देण्यासाठी पन्नास हजार रुपये लाच मागितली यावर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याची तक्रार दाखल करुन यावर सापळा रचून पोमण यास ही लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
