पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) नायगाव ग्रामपंचायत सरपंचपदी जितेंद्र पांडुरंग चौधरी यांची बिनविरोध निवड झाली.नुकताच गणेश गुलाब चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्याशी अधिकारी म्हणून उरुळीकांचनच्या मंडल अधिकारी नुरजहा सय्यद यानी काम पाहिले.या ग्रामपंचायतीत काळभैरवनाथ पॅनलचे निर्विवाद वर्चस्व असून अकरा ग्रामपंचायत सदस्यांपैकी या पॅनलचे आठ सदस्य आहेत.सर्वांना पदाची संधी मिळावी यासाठी सरपंचांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.सरपंच निवडणूक प्रक्रियेत आज जितेंद्र चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला विरोधकांकडून निर्धारित वेळेत कोणीही अर्ज दाखल केला नाही त्यामुळे जितेंद्र चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी जाहिर केले.

यावेळी ग्रामसेवक विजया भगत,तलाठी निवृत्ती गवारी, विद्यमान उपसरपंच उत्तम शेलार व सर्व सदस्य गणेश गुलाब चौधरी, कल्याणी संदीप हगवणे, पल्लवी नवनाथ गायकवाड, दत्तात्रय गणपत बारवकर, अश्विनी योगेश चौधरी, संगीता रघुनंदन शेलार, आरती अमोल चौधरी, बाळासाहेब गायकवाड, प्रियंका गायकवाड, रामचंद्र पवार‌, तंटामुक्ती अध्यक्ष संजय चौधरी, कैलास चौधरी, पोपट चौधरी, उत्तम घुले, नितीन हगवणे, संतोष हगवणे, कृष्णा चौधरी, प्रकाश चौधरी, सुरेश हगवणे, नामदेव चौधरी, विजय चौधरी, हेमंत चौधरी, पडीत चौधरी, संजय कामठे, नितीन चौधरी, सुनिल हागवणे, अमोल चौधरी, गणेश चौधरी, गुलाब पांडुरंग चौधरी, गोरख चौधरी, शिवाजी नामदेव चौधरी, भाऊसाहेब चौधरी, आबासाहेब चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.

निवडीनंतर सरपंच जितेंद्र चौधरी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी सर्व सन्माननीय सदस्य माजी सरपंच उपसरपंच यांना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने गावच्या विकासाच्या दृष्टीने वाटचाल करील असे प्रतिपादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *