पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून आण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास पुणे जिल्हा यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व ऑफलाइन प्रश्नोत्तर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते याला जिल्ह्यातील 138 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, यामध्ये प्रथम क्रमांक जुन्नर तालुक्यातील निमगाव महाळुंगे येथील श्रावणी कैलास घुले द्वितीय क्रमांक हववेली तालुक्यातील श्रीक्षेत्र थेऊर येथील संस्कृती दिलीप कुंजीर तर तिसरा क्रमांक नांदेड सिटी पुणे येथील सृष्टी सोमनाथ माळी यांनी पारितोषिक पटकावली.

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास चे विश्वस्त राधेश्याम जगताप यांनी आण्णासाहेब हजारे यांच्या 85 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि.8 जुन रोजी जिल्ह्य़ातील शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तर लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते यासाठी आण्णा हजारे यांच्या जीवनावरील अभ्यासक्रम देण्यात आला होता.त्यांचा वाढदिवस 15 जुन रोजी साजरा करण्यात येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *