हवेलीतील बहुतेक शाळांमधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत मुलींनीच बाजी मारली परंतु कोलवडी येथील न्यु इंग्लिश स्कूल या मराठी माध्यमातील शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.अलिकडे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याकडे कल असला तरीही अनेक मराठी माध्यमातील शाळांनी आपला शैक्षणिक दर्जा उंचावत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यात यश मिळविले आहे.
थेऊर येथील चिंतामणी विद्यालयाचा निकाल ९१.२५ टक्के लागला असून यात प्रथम क्रमांक कु.फिजा इमाम शेख(८५.६०)टक्के व्दित्तीय क्रमांक कु.अफरोज दिलदार शेख(८३.२०)टक्के तृत्तीय क्रमांक अनिकेत सुभाष गायकवाड(८२.४०)टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले असल्याची माहिती विघालयाचे प्राचार्य बाळासाहेब नेवाळे यांनी दिली.
कुंजीरवाडी येथील ग्रामीण सर्वांगिण विद्यालयाचा निकाल (९६.८०टक्के) लागला असून पहिले तिन्ही क्रमांक मुलीनी पटकावल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक डी.जी.आठमुठे यांनी दिली यामध्ये प्रथम क्रमांक कु. ऋतुजा दत्तात्रय कुंजीर ९१.८० टक्के, द्वितीय कु. कार्तिकी हरी हेंद्रे (९१.४०) टक्के, तृतीय क्रमांक साक्षी भगवान कांबळे( ९०.६०) टक्के, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन ग्रामीण सर्वांगीण विकास संघ कुंजीरवाडीचे कार्याध्यक्ष अरुण दत्तात्रय घुले यांनी केले.
कोलवडी येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळाचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक डी.एच. चत्तर यांनी दिली प्रथम क्रमांक अमन अंबिर आतार(८९.४०)टक्के,व्दितीय कु.दिव्या ब्रिजेश शर्मा(८९.२०)तृतीय कु.अंकिता नितिन गायकवाड(८८.८०) यांनी अनुक्रमे बाजी मारली.
आळंदी म्हातोबा येथील म्हातोबा माध्यमिक विद्यालयाचा निकाल-९६.८२टक्के लागला असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य एस.पी. भंडारी यांनी दिली असून प्रथम क्रमांक कु. श्रावणी मनोहर जवळकर (८६.४०)/ कु.संस्कृती नागनाथ माने (८६.४०) द्वितीय क्रमांक- कु. पायल प्रकाश भंडलकर(८६) तृतीय क्रमांक – कु. समीक्षा हनुमंत गायकवाड (८५.४०)टक्के सर्व उत्तीर्ण विद्यार्थीचे शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामस्थ शिक्षक वृंद पालकवर्ग यांनी अभिनंदन केले.