पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) शिरुर येथे पत्नी व सासूवर गोळीबार करणारा इसम व त्याच्या सोबत आलेला त्याच्या भावालाही शिरुर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दीपक पांडुरंग ढवळे रा.अंबरनाथ जि.ठाणे यास अटक करण्यात आली आहे.त्याने आपल्या परवाना प्राप्त पिस्तूलमधून पत्नी मंजुळा रंगनाथ झांबरे व सासू रा. वाडेगव्हाण ता.पारनेर जि. अहमदनगर याच्यावर गोळीबार केला त्यानंतर शिरुर येथील पाटबंधारे परिसरात एकच खळबळ उडाली यामध्ये मंजुळा झांबरे या मृत पावल्या तर त्याच्या सोबत आलेली त्यांची आई गंभीर जखमी झाली.

दीपक ढवळे आणि त्याची पत्नी मंजुळा यांच्यात पोटगीची केस चालू असून आज त्याच संदर्भात दीपक व त्याचा भाऊ शिरुर येथे आलेले होते दीपक ढवळे सेवानिवृत्त सैनिक आहेत. त्यांना यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *