लोणी-काळभोर (हवेलीनामा ऑनलाईन) समाज कार्य करण्याची प्रत्येकाची इच्छा असतेच परंतु जेंव्हा एखादा बाका प्रसंग येतो तेंव्हा त्यात सर्वस्व पणाला लावून काम करणारा मात्र एखादाच असतो पूर्व हवेलीतील विषेशतः शहरापासून जवळच असलेल्या लोणी-काळभोर परिसरात अशा अडचणीला धावणारा तरुण म्हणजे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा कार्यक्षम सदस्य राम भंडारी.
या परिसरात कुठेही बेवारस व्यक्ती रुग्ण अथवा एखादे प्रेत जरी असले तरीही सर्वात अगोदर पोहोचणारा रामच.रामचे मित्र परिवार देखील दांडगा त्यामुळेच कुठेही असा काही प्रसंग उद्भवल्यास याच्याशीच संपर्क करुन माहिती दिली जाते.त्यानंतर पुढील सुत्र हलतात.अशीच एक व्यक्ती लोणी-काळभोर येथील रेल्वेस्थानका शेजारी तब्बल चोवीस तास पडून होती.याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही हजारो नागरिक त्या रस्त्यावरून गेली असणार परंतु कोणी दारु पिऊन पडला असेल असेच अनेकांचा गृह झाला असणार परंतु चोवीस तास तो तेथेच उन्हात पडून असल्याचे राम भंडारी यांना समजताच ते तेथे धावले.त्यांनी ताबडतोब पोलिसांना याची कल्पना दिली व तातडीच्या सेवेसाठी 108 नंबर वर फोन करून रुग्णवाहिकेस पाचारण केले तर स्वतः त्या व्यक्तीला सावलीत आणले.

त्या व्यक्तीच्या पोटात किती दिवस अन्न नव्हते याची कल्पना नसल्याने त्याला पाणी देखील देता येत नव्हते.दरम्यान लोणी-काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई अजिंक्य जोजारे व घनशाम आडके घटनास्थळी पोहोचले थोड्याच वेळात रुग्णवाहिका तेथे पोहोचली त्यासोबत डॉ. वीरकर, रुग्णवाहिका चालक शानु आत्तार तेथे आले.त्यांनी त्या व्यक्तीला उचलून स्ट्रेचरवर ठेवून रुग्णवाहिकेत घेतले.व ससून रुग्णालयात घेऊन गेले.
