पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसापासून मोटारसायकल चोरीच्या घटनेत वाढ झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या विशेष सूचनेनुसार याला आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी तपास पथक तयार करून तपासाच्या सूचना दिल्या त्यावर यापथकाने जबरदस्त कामगिरी करीत पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सतरा मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.
पोलिसांकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार,अलिकडे अनेक पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीच्या घटना वाढल्या असल्याने यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना मिळाल्या त्यानुसार पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुहास रेकडे, सहा.फौज.दतात्रय शिंदे, पो.हवा.वैभव मोरे, पोलीस शिपाई.विजय शिंदे, उमेश कुतवळ,रघुनाथ हाळनोर,यांना मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्याबाबत सुचना दिल्या.
तपासत पथकाने रांजणगाव एम आय डी सी परिसरात साध्या वेषांतर करून वेळोवेळी सापाळा लावुन,सी.सी.टि.व्हि. फुटेज चेक करुन तसेच गुप्त बातमीदाशांशी संपर्कात राहुन मोटार सायकल चोरांना
पकडण्याचा चंग बांधला होता. त्यानुसार गुप्त बातमीदारामार्फत तपास पथकास माहिती मिळाली
की, संशरीत नामे 1) ज्ञानेश्वर उर्फ माऊली गंगाराम कौतुके श. अंमळनेर,ता.जि.अ.नगर. 2) रोहित सुभाष बोंद्रे 3) शुभम शिवाजी रक्टे दोन्ही रा. शिबलापुर, ता. संगमनेर, जि. अ.नगर, 4) गणेश भाऊसाहेब नांगरे श.खळी, ता.संगमनेर, जि. अ. नगर 5 ) रमाकांत बाजीराव करपे रा.गणेगाव, ता. शिरुर,जि. पुणे. यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली त्यानुसार त्यांचेकडुन रांजणगाव एम आय डी सी पो.स्टे. — 06, शिक्रापुर पो.स्टे.-01, लोणीकंद पो.स्टे.-01, आळेफाटा पो.स्टे. – 01, शिरुर पो. स्टे 01, खडी पो.स्टे.पुणे शहर – 01, शिर्डी पो.स्टे. अ.नगर – 02, घारगाव पो.स्टे.-01, संगमनेर
पो.स्टे. -02. व इतर-01, अशा एकुण 17 मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.
सदर गुन्हा करण्याची पध्दत हि विशेषतः हिरो होंडा मोटासायकलचे हँ्डल लाँक तोडून चोरी करणे व चोरीच्या मोटार सायकल विनाकागदपत्रांच्या अल्प किंमतीमध्ये ग्रामीण भागात विक्री करून कागदपत्रे दिल्यावर बाकीचे पैसे घेवुन जातो असे सांगुन मोटार सायकलची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
