पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) महिलांच्या गळ्यातील मौल्यवान वस्तू जबरदस्तीने हिसकावून पोबारा करणारा सराईतास अखेर गुन्हे शाखेच्या ग्रामीण पथकाने रांजणगाव येथून अटक केले त्याच्याकडे केलेल्या अधिक तपासात चार गुन्ह्याची उकल झाली आहे तर तीन पोलीस स्टेशन साठी वेगवेगळ्या गुन्ह्यात तो हवा आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सासवड पोलिस स्टेशन हद्दीतील जबरी चोरी गुन्ह्याचा तपास करीत असताना . गुन्हे शाखेच्या पथकातिल पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव यांना बातमीदार मार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यातील पाहिजे असलेला मंगल बजरंग नानावत रा वढू बुद्रुक ता शिरूर जि पुणे हा रांजणगाव येथे येणार असल्याचे समजले त्यावरून त्या ठिकाणी सापळा रचून ,त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, मंगल नानावत याने सासवड, लोणी-काळभोर, देहूरोड भोसरी एम आय डी सी येथे गुन्हे केले असल्याबाबत सांगितले आहे.तर शिक्रापूर व लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्यात तो फरार असल्याची नोंद आहे.
ही कारवाई ही पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपधिक्षक भोर धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनखाली
स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके,उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पो हवा विजय कांचन, पो ना समाधान नाईकनवरे, पो ना बाळासाहेब खडके, पो ना अमोल शेडगे, पो कॉ धिरज जाधव व पो कॉ पूनम गुंड आणि पौड पोलिस स्टेशन चे पो ना रॉकी देवकाते पो कॉ साहिल शेख यांनी केली आहे.
