पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) सध्या आय पी एल क्रिकेटचा मोसम जोरात चालू असून क्रिकेट शोकिनांसाठी चांगली मेजवानी आहे परंतु याच खेळावर सट्टा लाऊन जुगार खेळणाऱ्यांची संख्या वाढत आहे याला प्रतिबंध करण्यासाठी शहर पोलीसांनी कंबर कसली असून गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने आपल्या कार्यक्षेत्रात कारवाई करत चार जणांना गजाआड केले त्यांच्याकडून दहा मोबाईल सेटसह 67,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट 6 चे पथक आपल्या कार्यक्षेत्रात गस्त घालत असताना लोणी-काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील वडकी परिसरात काही इसम आय पी एल क्रिकेटवर सट्टा लाऊन जुगार खेळत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली याची कल्पना पोलीस निरीक्षक गणेश माने यांना याची माहिती दिली त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार वडकी येथे धाड टाकून परेश मोहन भूत व प्रफुल्ल नरेंद्र कलावटे दोघेही रा. फुलवाला चौक गुरुवार पेठ पुणे यांना सट्टा घेताना तर अक्षय पांडुरंग ठोंबरे व महेश राजेंद्र क्षिरसागर दोघेही शिवराधानगर वडकीनाला यांना ताब्यात घेतले.

घटनास्थळावरून पोलीसांनी 10 मोबाईल सेटसह कॅलक्युलेटर मार्कर पेन नोंदवही असा 67,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यासाठी वापरण्यात आलेले मोबाईल सिमकार्ड खोटी कागदपत्र देऊन खरेदी करण्यात आलेले होते असे तपास निष्पन्न झालले आहे यासंदर्भात लोणी-काळभोर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, .पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त ,गुन्हे, रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा,श्रीनिवास घाडगे,सहा. पोलीस आयुक्त,गुन्हे-२,.नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा,युनिट-६ चे पोलीस निरीक्षक, गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठलखेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *