पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) गेली अनेक दिवसांपासून रखडलेल्या थेऊर थेऊरफाटा रस्त्याचे काम अखेर चालू करण्यास न्यायालयाने परवाणगी दिली त्यामुळे थेऊर येथे येणाऱ्या भाविकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
थेऊर हे अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असून येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातुन भाविक श्री चिंतामणी दर्शनासाठी येतात कोरोना महामारीनंतर धार्मिक स्थळे उघडी झाली त्यामुळे गेल्या काही दिवसात धार्मिक स्थळावर गर्दीत मोठी वाढ झाली.अष्टविनायक रस्ते विकास अंतर्गत सर्व रस्त्याचे रुंदीकरण होत असून कोट्यवधी रुपयांचा निधी यावर टाकलेला आहे असाच निधी लोणीकंद थेऊरफाटा या मार्गासाठी सन २०१८ मध्ये ५० ते ५५ कोटींचा निधी पडला असला तरीही आजपर्यंत यारस्त्याचे संपूर्ण काम होऊ शकले नाही हे काम तीन टप्प्यात होत असून केवळ एक टप्पा पूर्णत्वास झाला असे दिसते परंतु थेऊर ते थेऊर फाटा या मार्गाची अतिशय दुरावस्था झाल्याने येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो होता.
शासनाकडे वहिवाटीस असलेल्या बारा मिटर रस्त्याची हद्द निश्चित करणे व साडे पाच मिटर डांबरी रस्त्याच्या कामाला कसलीच हरकत नाही त्यामुळे हे काम लगेच चालू होणार आहे असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांनी सांगितले.बाधित शेतकऱ्यांकडून रुंदीकरणा विरुद्ध उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यात आल्याने गेली दीड वर्षांपासून या रस्त्याचे काम होऊ शकत नव्हते.सार्वजनिक बांधकाम विभाग व शेतकरी यांची बाजू ऐकून न्यायालयाने सार्वजनिक हिताचा प्रश्न मार्गी लावला.यामुळे रस्त्याचे काम सुरु होईल तर हद्द निश्चितीसाठी टी एल आर कडून 5 जून पर्यंत मोजणी करुन घेतली जाईल परंतू कामाला लगेच सुरुवात होणार आहे.
