पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) पुणे शहर व परिसरात पिस्तूल विक्री करणार्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडील तीन पिस्तूलासह वेगवेगळ्या जणांना विकलेल्या आठ पिस्तूल व जीवंत काडतूस असा तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल शहर गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने कारवाई करत हस्तगत केला आहे.या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार,
शहरामध्ये अवैधरित्या अग्निशस्त्रे बाळगणार्या तसेच विक्री करणा-यांवर आळा बसावा, याकरिता वरिष्ठांकडून मिळालेल्या आदेशानुसार शहर पोलिस मोहिम राबवत आहे युनिट सहाचे पथक हद्दीमध्ये गस्त घालत असताना,एक सराईत पुणे अहमदनगर महाामार्गावरी केसनंद फाटा,वाघोली, येथे पिस्तूल विकण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली असता युनिट सहाचे पोलिस निरिक्षक गणेश माने व त्यांच्या पोलीस पथकाने केसनंद रोड,वाघोली येथे सापळा रचून ज्ञानेश्वर
उर्फ रुद्रा सर्जेराव डुकरे,वय २१ वर्षे,रा.सध्या कुहाड पार्किंग,लखन ढगे यांचे खोलीत,शनि शिंगणापूर,ता.नेवासा जि.अहमदनगर मुळगांव-मु.पो.टेंभी अंतरवाली,ता.घणसांगवी,जिल्हा जालना यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ०३ पिस्तूल ६ जिवंत काडतूसे सापडले.त्याच्या कडे आधिक चौकशी केली असता तो ही पिस्तूल )निखील उर्फ सनी बाळासाहेब पवार,वय २३ वर्षे, रा. एमआयटी
कॉलेज जवळ,लोणी काळभोर,पुणे यास २ पिस्टल व २ जिवंत काडतूसे, २)युवराज बापू गुंड,वय २४ वर्षे, रा.
पांडवनगर,वडकी गाव,ता.हवेली,जि.पुणे यास १ पिस्टल व १ जिवंत काडतूस व ३)अमोल नवनाथ तांबे,वय २७ वर्षे,रा.गोटूंबे आखाडा,ता.राहूरी,जि.अहमदनगर यास २ पिस्टल व २ जिवंत काडतूस विकल्याचे सांगितले त्यानुसार त्यांना अटक करून त्यांच्याकडून त्यांनी खरेदी केलेले पिस्तूल व काडतूसे हस्तगत करण्यात
आली आहेत. तसेच ज्ञानेश्वर उर्फ रुद्रा सर्जेराव डुकरे, वय २१ वर्षे याच्या घरातून ३ पिस्टल व ३ जिवंत
काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.
अशाप्रकारे यांचेकडुन एकूण ३,३५.६००/- रु किंमतीची ११ पिस्टल व १४ जिवंत काडतूसे
गुन्हयामध्ये जप्त करण्यात आली आहेत. या तपासात शंकर नायक, रा.उज्जैन,मध्ये प्रदेश याच्याकडून
अग्निशस्त्रे आणून पुणे परिसरामध्ये विकत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, .पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त ,गुन्हे, रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा,श्रीनिवास घाडगे,सहा. पोलीस आयुक्त,गुन्हे-२,.नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा,युनिट-६
चे पोलीस निरीक्षक, गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल
खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.
