थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) आजपर्यंत आपण केवळ इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशाची उत्सुकता व लगबग होताना पाहिली यासाठी चालत असलेली ससेहोलपट सुध्दा अनुभवली परंतु मराठी माध्यमातील त्यातही जिल्हा परिषद शाळेत प्रवेशाचा उत्सव म्हणजे एक नाविन्य होय पण हा अनुभव थेऊर येथील प्रयोगशिल व उपक्रमशिल असलेल्पा तारमळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनुभवण्यास आला.

मानवी जीवनात शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आपला पाल्य सुसंस्कृत व उच्चशिक्षित असावे असे प्रत्येक पालकांची अपेक्षा असते त्पासाठीच आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी धडपड चालू असते.अलिकडे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची लालसा वाढली परंतु कोणत्याहो बालकास मातृभाषेतून शिक्षण देणे हे नैसर्गीक आकलनास सोयीचे जाते.परंतु याकडे सरळ दुर्लक्ष करून मुलांवर दडपण आणले जाते.मराठी भाषेतून उत्तम शिक्षण मिळावे अशी अनेकांची इच्छा आहे पण ते होत नाही याला कायम अपवाद असणारी तारमळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होय येथे प्रवेश घेण्यासाठी पालकांची पहीली पसंती असते.येथील शैक्षणिक वातावरण अपसूकच विद्यार्थ्यांवर शिकण्याची भूरळ घालते.

आज या शाळेत पुढील वर्षाचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.नवोदित प्रवेशार्थीचे कुंकूम तिलक लाऊन स्वागत करण्यात आले.तर मुलांनीच तयार केलेल्या सेल्फी पाॅइंटवर फोटो काढण्यात आले.यावेळी विस्तार अधिकारी इंदलकर तसेच केंद्र प्रमुख मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *