थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) यावर्षीच्या पहिल्याच अंगारकी चतुर्थीस अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर येथे श्री चिंतामणी गणपती दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या.उन्हाची दाहकता अधिक असल्याने नेहमीपेक्षा भाविकांची संख्या खुपच कमी होती.

देवालयाचे पुजारी राजेंद्र आगलावे यांनी पहाटे महापुजा करुन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले.त्यानंतर भक्तांच्या संख्येत वाढ होत गेली उन्हापासून बचाव होण्यासाठी मंदिर परिसरात कापडी मांडव तर बाहेर दर्शन बारीसाठी नेट बांधण्यात आली होती.तसेच पायघड्या सुध्दा अंथरण्यात आल्या होत्या.भाविकांना पिण्याचे पाणी,फराळ वाटप करण्यात आला.

मंदिरातील सुरक्षारक्षकांनी भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी मदत केली.चिंचवड देवस्थानचे व्यवस्थापक डाॅ पोफळे सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते.सायंकाळी ह भ प निळोबा महाराज विभुते यांचे किर्तन पार पडले.त्यानंतर चंद्रोदयानंतर छबिना काढण्यात आला यात अनेक भाविकभक्त सहभागी झाले.महाआरती नंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.

     -थेऊर ते थेऊर फाटा या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याने अनेक भाविकांनी थेऊरला येणे टाळले त्याऐवजी अन्य गणपती मंदिरात दर्शनासाठी जाणे पसंत केले.या रस्त्याचा प्रश्न खुपच गंभीर व जटील बनला असून तो केंव्हा सुटेल याची खात्रीच नाही याचा परिणाम येथील अर्थकारणावर झाल्याचे दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *