लोणी-काळभोर (हवेलीनामा ऑनलाईन ) अभिनव चेतना मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.सोपानराव हडके यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मंडळाच्या वतीने मोफत नेञ तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया,अस्थिरोग तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात तीनशेहून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी तर शंभरहून अधिक नागरिकांच्या हडाची तपासणी करण्यात आली.

या शिबीराचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावच्या सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच संगीता काळभोर माजी सरपंच शरद काळभोर,योगेश काळभोर,मंडळाचे उपाध्यक्ष हेमंत हाडके,अभिनव चेतना पतसंस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कुंभार, संचालक मुकुंद काळभोर, सचिन काळभोर, रमेश भोसले,अशोक भोसले पांडुरंग काळभोर जयेश हाडके शामराव शेवाळे कृष्णा पवार विठ्ठल लांडगे तसेच साधना बॅकेच्या संचालिका वंदना काळभोर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर,पंचायत समिती सदस्य सनी काळभोर, महाराष्ट्रकेसरी राहुल काळभोर,चितरंजन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

नेत्ररोग तपासणी शिबीरात डाॅ अनिल काळे यांनी 300 हून अधिक नागरिकांची तपासणी करुन 200 पेक्षा जास्त जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.तर 30 जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंद करण्यात आली.तसेच अस्थिरोग तज्ञ डाॅ सुयोग काळभोर यांनी 100 जणांची तपासणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *