थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) गावपातळीवरील सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न असतात ते सोडविण्यासाठी आमदार आपल्या गावी ही संकल्पना राबविणार असून त्यामध्ये रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना यांच्या संबंधी अडचणी तसेच शासनाच्या विविध विभागांशी संबंधित असलेल्या अडचणी सोडविणे यासाठी प्रयत्न करणार असल्पाचे आमदार अशोक पवार यांनी स्पष्ट केले.

नायगाव तालुका हवेली येथे ग्रामपंचायतच्या वतीने 1कोटी 27 लक्ष रुपये रकमेच्या विकास कामांचे उद्घाटन आमदार पवार यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. यामध्ये जि प शाळा मार्ग वस्ती दुरुस्ती,सिद्धार्थनगर येथील सभामंडप,अंतर्गत रस्ते, वितरण नलिका, भिल्ल वस्ती येथील अंतर्गत रस्ते, जन जीवन अंतर्गत कटकेवस्ती, आदर्श कॉलनी, मार्ग वस्ती येथे वितरण नलिका टाकने , बंदिस्त गटर लाईन काम इत्यादी कामाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पंचायतीच्या वतीने नायगाव पेठ शिव रस्ता, सौर ऊर्जा प्रकल्प,पानंद रस्ता, ग्राप कार्यालय विस्तारीकरण, सभामंडप, नवीन ट्रान्सफॉर्मर इत्यादी बाबत मदत करण्याचे आवाहन माजी प्रभारी सरपंच राजेंद्र चौधरी यांनी केले . गावचे विकास कामांसाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आमदार अशोक पवार यांनी आश्वासन दिले . आमदार आपल्या गावी ही संकल्पना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर,ज्येष्ठ नागरिक राज्य प्रमुख सोनबा चौधरी, कावेरी कुंजीर, रामदास चौधरी, जी बी चौधरी,रघुनाथ चौधरी,सुरज चौधरी,दत्तात्रय चौधरी, रंगनाथ कड निलेश खटाटे,अमित चौधरी,सनी चौधरी,रमेश मेमाने तुळशीराम चौधरी , देवराज चौधरी,प्रकाश गोळे ,उपअभियंता पी जे गवळी, संजय गीते, नलावडे, ठेकेदार संतोष बोधे इत्यादी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजन सरपंच गणेश गुलाब चौधरी,उपसरपंच पल्लवी नवनाथ गायकवाड, विद्यमान सदस्य जितेंद्र चौधरी,उत्तम शेलार,दत्तात्रय बारवकर , कल्याणी हगवणे,बाळसाहेब गायकवाड, अश्विनी चौधरी, आरती चौधरी , संगीता शेलार, प्रियंका गायकवाड यांनी केले होते. तसेच कृष्णा आप्पा चौधरी, डॉक्टर हेमंत चौधरी, संजय वसंत चौधरी,पंडित चौधरी, माया चौधरी माजी उपसरपंच ज्ञानोबा शेलार विजय चौधरी गणेश चौधरी संतोष हगवणे सुनील हगवणे कैलास चौधरी पोपट चौधरी उत्तम घुले , गुलाब चौधरी, अमोल चौधरी नितीन हगवणे संजय कामठे ,नितीन चौधरी, भाऊसाहेब चौधरी,नवनाथ गायकवाड विजय चौधरी बाप्पू चौधरी योगेश चौधरी नंदू चौधरी संजय चौधरी मुकिंदा गुळजकर गोरख चौधरी अर्जुन चौधरी किरण गुळजकर राजेंद्र शेलार, दत्तात्रय गुळजकर , पोपट मो चौधरी पदाधिकारी व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. सूत्रसंचालन रामचंद्र पवार यांनी केले .
