पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) अनियंत्रित मोटार चालकाने चौकात उभ्पा असलेल्या दुचाकीस्वारास ठोसर देऊन पसार झाला पात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लोणीकाळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अपघातात जावेद बद्रोद्दिन मुलाणी वय(३८वर्ष) राहणार सध्या कुंजीरवाडी(ता.हवेली) मुळ(देगाव मांजरे ता.बार्शी जि.सोलापूर) हा गंभीर जखमी झाला आहे.
कुंजीरवाडी येथे राहणारा जावेद हा पिण्याचे पाणी आणण्यासाठी त्याच्या फळ विक्री दुकानावरुन दुचाकीवरुन कुंजीरवाडी चौकात आला असता म्हतोबा आंळदीच्या रस्त्याकडे जाण्यासाठी चौकात असालेल्या पंक्चरच्या दुकानात थांबलेला असताना सोलापूरकडून पुण्याकडच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विप्ट डिझायर वरील अज्ञात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दुचाकीला जोरात धडक दिली यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही पाय फॅक्चर असून डोक्याला देखील दुखापत झाली आहे जखमीला पुढील उपचारासाठी तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यावर उपचार सुरु आहेत पुढील तपास थेऊरचे पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विजय जाधव,विशाल बनकर करत आहे.
