थेऊर (हवेलीनामा आॕनलाईन) येथील श्री चिंतामणी गणपती मंदिरात असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आज श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आगलावे बंधू यांनी हनुमानाची विधिवत महापुजा केली.त्यानंतर थेऊर येथील चिंतामणी प्रासादिक भजनी मंडळाने संतांचे अभंगसह हनुमानाचे अभंग सादर केले. यावेळी चिंचवड देवस्थानचे माजी विश्वस्त महादेव काकडे, दत्ताञय कुंजीर,ग्रामपंचायत सदस्य संतोष काकडे, हभप बाबुराव कुंजीर, ज्ञानोबा कुंजीर,एकनाथ तारु, विठ्ठल कुंजीर, नरसिंग सुरवसे, सुखराज काळे, लक्ष्मण कुंजीर, बबन कुंजीर,आनंदा काकडे,रंजनाबाई सोनवणे याांनी भजन सादर केले सुर्योदयानंतर जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला व महाआरती होऊन उत्सव साजरा केला उपस्थित ग्रामस्थ,भजनीमंडळ भक्तासाठी फळे व सुंठवडा प्रसादाचे वाटप केले यावेळी मुकुंद आगलावे, राहुल आगलावे, सचिन आगलावे,चेतन आगलावे, राजेंद्र आगलावे उपस्थित होते. तसेच महिलांनीही दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रभावामुळे पेथे होणारा महारुद्रयाग खंडीत झाला होता परंतु यावर्षी पुन्हा मोठ्या उत्साहात पार पडला त्यानंतर भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.
