थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन)
अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेले थेऊरगाव श्री चिंतामणी गणपतीच्या वास्तव्याने पुनीत झालेले गाव आहे .या गावाकडे येणारा रस्ता थेऊर फाटा ते थेऊर गाव हा गेली पाच वर्षापासून नादुरुस्त अवस्थेत आहे. सोलापूर महामार्ग ते नगर महामार्ग यांना जोडणारा रस्ता थेऊर गावातून जात आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक असते. तसेच श्री चिंतामणी च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात असते.परंतु खड्डेमय झालेल्या या रस्त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वेळोवेळी झालेल्या अपघातामध्ये आठ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृत व्यक्तीची जबाबदारी घेण्यास कोणतीही शासकीय यंत्रणा पुढे येताना दिसत नाही. मागील आठवड्यामध्ये कोलवडी गावातील दोन तरुणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. त्याबाबत बहुजन दलित महासंघाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी पुणे व माननीय पोलिस आयुक्त पुणे यांना निवेदन देऊन अपघातासाठी कारणीभूत ठरणारी जड वाहतूक रस्ता दुरुस्त होईपर्यंत बंद करावी अशी मागणी केली होती. परंतु आठ दहा दिवस उलटून देखील याबाबत कोणताही ठोस निर्णय शासकीय पातळीवर झाला नाही त्यामुळे बहुजन दलित महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आनंद वैराट यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाच्या सुरुवातीलाच अपघातात मृत पावलेल्या तरुणांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी बहुजन दलित महासंघाचे नेते आनंद वैराट यांनी आंदोलना पाठीमागील आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष मारुती कांबळे यांनी देखील या ठिकाणी पक्षाच्या वतीने आपली भूमिका मांडली .बाधित शेतकऱ्यांच्या वतीने अजय कुंजीर यांनी आपले मत व्यक्त केले
लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रजी मोकाशी साहेब यांनी आंदोलनकर्त्यां कडून निवेदन स्वीकारले. व आपल्या मागण्या शासन स्तरावर मांडून पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले आं आंदोलनकर्त्यांनी काही प्रमुख मागण्या या निवेदनामध्ये केलेले आहे
१)थेऊर फाटा ते थेऊर गाव या रस्त्यावरील जड वाहतूक रस्ता दुरुस्त होईपर्यंत बंद करावी.
२)अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी.
३) बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा योग्य तो मोबदला देण्यात यावा.
४) थेऊरगाव ते थेऊर फाटा रस्ता त्वरित दुरुस्ती करावा.
या आंदोलनामध्ये बहुजन दलित महासंघाचे नेते आनंद वैराट,झोपडपट्टी सुरक्षा दलाचे गोरोबा पवार, रिपब्लिकन पक्षाचे मारुतीदादा कांबळे, चिंतामणी सहासिटर संघटणेचे संजय गावडे, मोरेश्वर वैराट,अभिजीत तारु, बहुजन दलित महासंघाचे सहदेव खंडागळे,तानाजी रणदिवे,देवा लोंढे,शिवसेनेचे संतोष खारतोडे,बाधित शेतकरी अजय कुंजीर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धनंजय चौधरी,सागर राजगुरू,निखील काकडे,रणस्थंभ समितीचे कुमार नितनवरे, ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, गजानन आगलावे,भगवान शेडगे,बाळा वाघमारे ,किरण काकडे,बाबु बोडके,अभिजीत गायकवाड,सतिष गावडे,सागर गायकवाड,सागर पवार, ऋषिकेश गायकवाड, अनिष तारु,विशाल घाडगे,सनी राऊत, राहुल वायसे,हिरामण लोंढे,दादा गुरव,राहुल गायकवाड, पोलीस पाटील रेश्माताई कांबळे, अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणांचे नातेवाईक थेऊर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .त्याचप्रमाणे लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने देखील काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

वाहतूक विभागाचे एसीपी सुनील यादव, हडपसर वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
