पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) घरफोडी करणारा सराईत गुन्हेगारास पाटील इस्टेट शिवाजीनगर येथून पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडून अटक घरफोडीचे तब्बल ७ गुन्हे उघडकीस आले असून सदर इसमाकडून ४,९७,०८५रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्हाचा तपास करत असताना युनिट ६चे पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या पथकास मिळेलेल्या महितीवरुन लोणीकंद येथील घरफोडीचा संशयित मोहन देविदास बनसोडे वय (२१)वर्षे राहणार लेन नंबर ७ पाटील इस्टेट,शिवाजीनगर पुणे यास शिवाजीनगर पुलाखालून ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या मावशी सोबत मिळून पुणे शहरातील डेक्कन पो. स्टे. मधील दोन गुन्हे व समर्थ, सिंहगड रोड,लोणीकंद व कोंढवा पो. स्टे.मधील प्रत्येकी एक असे एकूण ७ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडून गुन्हयातील ४,९६,०८५/- रु किचा मुद्देमाल त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. तसेच काही दिवसापूर्वी गुन्हयातील सहआरोपी त्याची मावशी इलेक्ट्रीक शॉक लागुन मयत झाल्याचे त्याने सांगितले आहे.
ही कामगिरी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलीस सह आयुक्त,डॉ.रविंद्र शिसवे, मा.अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,रामनाथ पोकळे,पोलीस उपआयुक्त,गुन्हे शाखा,श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त,गुन्हे-२,नारायण शिरगावकर यांचे
मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा,युनिट-६ चे पोलीस निरीक्षक,गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे यांनी केली आहे.
