पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) विद्यापीठ अनुदान आयोगाने एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रमास प्रवेश  घेता येईल अशी घोषणा केली त्यामुळे विद्यार्थ्यांना आता दोन पूर्ण वेळ अभ्यासक्रम पूर्ण करता येतील परंतु या दोन्ही अभ्यासक्रमाच्या वेळा एकच नसाव्यात यामध्ये एक पूर्ण वेळ अभ्यासक्रम तर एक आॕनलाईन अथवा बहिस्थ पध्दतीने हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.या निर्णयाची अंमलबजावणी विद्यापीठांनी करावी अशा सूचना यू जी सी कडून देण्यात आल्या आहेत.

           नविन  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरशाखीय शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे.याचा मुख्य हेतू असा आहे की कला व विज्ञान शाखेतील दरी निर्माण होऊ नये तसेच केवळ एकाच शाखेपुरते शिक्षण मर्यादित राहू नये सर्व शाखेचे शिक्षण घेता यावे यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य यांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.
        आॕनलाईन अथवा बहिस्थ शिक्षण घेताना संबंधित संस्थेने अथवा महाविद्यालयाला शिखर संस्थेची मान्यता घेणे आवश्यक आहे.या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतरच्या तारखेपासून अस्तित्वात येईल यापूर्वी एकाच वेळेस दोन अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा घेता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *