थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) उरुळी कांचन येथील एका सराईत गुन्हेगाराने एक डाॅक्टरासह एका खाजगी व्यक्तीकडे आपण गर्भलिंग चाचणी करता अशी खोटी बतावणी करत त्यांच्याकडे तीस लाखाची खंडणीची मागणी केली लोणी काळभोर पोलिसात तक्रार दाखल झाल्यावर या सराईत गुन्हेगारास रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

    लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार,उरळीकांचन येथील सराईत गुन्हेगार मंगेश माणिक कांचन याने तक्रारदार व त्याचे डाॕक्टर मित्र यांना तुम्ही गर्भलिंग निदान व गर्भपात करता असे खोटे साक्षीदार उभे करून तसेच माझ्याकडे तसे व्हिडिओ आहेत अशी बतावणी करून त्यांच्याकडे तीस लाखाची खंडणी मागितली.तर या सराईताने तक्रारदारास आपल्या एका साथिदारासह उरुळीकांचन येथे पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणीसाठी धमकावण्यात आले.
        यावर लोणी-काळभोर पोलीसांनी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून तक्रारदार यांचेकडून सराईत गुन्हेगार याचे राहते घरी खंडणी स्विकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.त्याच्याकडून खंडणीची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.मंगेश कांचन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यवत पौड लोणीकंद ओतूर विमानतळ हिंजवडी या पोलीस स्टेशनमध्ये खून खंडणी दरोडा जबरी चोरी अपहरण अशा विविध 12 गुन्ह्याची नोंद आहे.
         पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *