थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) संत श्री बाळूमामा यांच्या भावभक्तिच्या भडारा उद्या मंगळवार दिनांक 12 एप्रिल रोजी चैत्र शुद्ध एकादशी या दिवशी होणार असून परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे
हवेली तालुक्यातील कल्लकवाडी, पिंपरी सांडस येथे श्री बाळूमामा यांचे मंदिर असून तेथे गेले बारा वर्षापासून भावभक्तीचा भंडारा हा कार्यक्रम आयोजित केला जातो यामध्ये डोंगरगाव, पेरणे, बुर्केगाव, हिंगणगाव, वडगाव वांडे, नाव्ही सांडस, अष्टापुर, शिरसवडी, वढू बुद्रुक या गावातील भाविक हा उत्सव साजरा करतात.

संत श्री बाळूमामा यांचे मूळ ठिकाण असलेल्या आदमापुर येथील उत्सवा प्रमाणेच हा उत्सव साजरा केला जातो यामध्ये हजारो भाविक भक्त सहभागी होत असतात हवेलीतील अनेक गावातील भाविक येथे मोठ्या संख्येने गर्दी करत असतात हा उत्सव दोन दिवस चालणार असून मंगळवार एकादशी व बुधवारी द्वादशी असा हा दोन दिवस उत्सव चालेल यामध्ये महाअभिषेक पालखी सोहळा हरिकीर्तन याबरोबरच भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे अशी माहिती उत्सव कमिटी कडून देण्यात आली आहे
