थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) पूर्व हवेलीतील गावात मर्यादापुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरा करण्यात आला गेल्या कित्येक वर्षांपासून लोणी काळभोर येथील श्री रामदरा या तीर्थक्षेत्री हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होत असतो गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे हा उत्सव होऊ शकला नव्हता त्यामुळे यावर्षी येथे जवळपास पन्नास हजारांहून अधिक भाविक जमलै होते यांना वेळेत व शिस्तीत दर्शन व्हावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छत्रपती संभाजीनगर मधील सत्तर ते पंच्याहत्तर स्वयंसेवकांनी सेवा केली. भक्तांनी पारंपरिक लेझीम व ढोलाच्या तालावर ठेका धरला जन्मोत्सवानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला,हा महाप्रसाद सायंकाळपर्यंत चालू होता.

तसेच थेऊर येथील श्री चिंतामणि मंदिरातील लक्ष्मी विष्णू मंदिरात श्री राम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला यावेळी गावातील अनेक भाविकभक्त यांनी मोठी गर्दी केली होती आज रविवार असल्याने ाहेरगावावरून येणार्या भाविकांची ही मोठी संख्या होती
मर्यादापुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या दिवशी झाला याच दिवशी सर्वत्र राम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतो तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर गावामध्ये भगवान विष्णू यांच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी हा जन्मोत्सव सोहळा पार पडला यावेळी देवालयाचे पुजारी पोफळे यांनी विधिवत पूजा करून जन्म उत्सवाच्या वेळी दुपारी साडेबारा वाजता गुलाल व पुष्प वाटप केली

सकाळी दहा वाजता येथे चिंतामणी प्रासादिक भजनी मंडळ यांचे वतीने राम जन्मोत्सव आख्यानावर हरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाविकांनी या कीर्तन-श्रवणाचा लाभ घेतला दुपारी साडेबारा वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे ही वाटप करण्यात आले तसेच आगलावे बंधू यांच्याकडून सुंठवडा व फळ वाटप करण्यात आले.
गेली दोन वर्ष कोरोना महामारी मुळे अनेक उत्सव साजरे करता आले नाहीत त्यामुळे यावर्षी प्रत्येक उत्सव अतिशय उत्साहाने साजरा होत आहे.
तसेच कुंजीरवाडी,उरुळी कांचन, कोलवडी,नायगाव आदी गावात जन्मोत्सवाचा उत्साह होता.

