पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) पुणे महानगरपालिकेच्या कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तासह त्याचे  दोन सहकारी यांना पंधरा हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले त्यांच्यावर कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

       लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांनी कोथरूड परिसरामध्ये कॉंक्रिटीकरण व ड्रेनेज चे काम केले त्याचे बिल मिळण्यासाठी त्यांनी सहाय्यक आयुक्त सचिन चंद्रकांत तामखेडे यांच्याकडे बिलाची मागणी केली त्यावर त्यांनी या बिलासाठी 25 हजाराची लाच मागणी केली त्यावर तडजोडी अंती पंधरा हजार रुपये देण्याचे मान्य केले तक्रारदार यांनी याची रीतसर तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली या विभागाने याची खातरजमा केल्यानंतर आज सोमवारी सापळा कारवाईदरम्यान लाचेची रक्कम त्यांना देण्यासाठी गेले असता त्यांनी त्यांचे सहकारी कनिष्ठ अभियंता अनंत ठोक यांच्याकडे ही रक्कम देण्याचे सांगितले त्यावर ठोक यांच्याकडे गेले असता त्यांनी कार्यालय शिपाई दत्तात्रेय किंडरे यांच्याकडे ही रक्कम देण्याचे सांगितले त्यानुसार ही रक्कम किंडरे यांनी स्वीकारली त्यावर या तिघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडून कोथरूड पोलिसांच्या ताब्यात दिले.
           ही कारवाई पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव,अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
         तर पुढील कारवाई इ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *