लोणी काळभोर (हवेलीनामा ऑनलाईन) पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पी एम पीची हडपसर पासून तीर्थक्षेत्र रामदर्यापर्यंतची बससेवा आज पासून चालू झाली आहे यामुळे हवेलीतील तीर्थक्षेत्र पर्यटनास हातभार लागणार आहे.
एस टी बसच्या संपामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे पीएमपीने पुण्याच्या सर्व बाजूस आपला विस्तार वाढवला असून लोणावळा, शिवनेरी, कारेगाव, कुरकुंभ, मोरगाव इथपर्यंत ही सेवा सध्या पुरविण्यात येत आहे त्यामुळे महसुलातही मोठी वाढ होत आहे पुणे शहराच्या पूर्व भागात अष्टविनायकापैकी एक असलेले तीर्थक्षेत्र थेऊर प्रमाणेच निसर्ग पर्यटनाबरोबरच राम मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र रामदरा येथे अनेक पर्यटक येत असतात आजूबाजूचा निसर्ग डोंगर हे अनेकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात परंतु सर्वसामान्य माणसांना तेथे जाणे अडचणीचे होते लोणी काळभोर गावापासून रामदर्याचे अंतर पाच किलोमीटर इतके असल्याने केवळ खाजगी वाहनानेच आज पर्यंत तेथे पोहोचता येत होते काही काळापूर्वी येथे अनेक भाविक चालत जात असत त्यामुळे अशा भाविकांची व पर्यटकांची गैरसोय लक्षात घेऊन रामदरा मंदिरापर्यंत बसची व्यवस्था व्हावी अशी तळमळ प्रशासनापर्यंत पोहोचवली यातूनच ही बस सेवा आज पासून नागरिकांच्या सेवेला सादर झालेली आहे.
लोणी काळभोरच्या पश्चिम भागात अनेक मोठमोठ्या लोक वस्त्या या मार्गावर येत असल्याने पूर्वी तेथील विद्यार्थी, कामगार, शेतकरी यांना बाहेर गावी जाण्यासाठी लोणी काळभोर गावात येऊन बस अथवा अन्य वाहनांतून जावे लागत असे परंतु आता त्या वस्ती पर्यंत बसची व्यवस्था झाल्याने विद्यार्थी शेतकरी तसेच स्थानिक नागरिक आनंदी झाला असून आपल्या दारापर्यंत ही सेवा मिळाली त्यामुळे तो खूपच उत्साहित झाला आहे तसेच बस व्यवस्था सुरू झाल्याने पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होईल अशी आशा स्थानिकांनी केलेली असून यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
आज बस ज्यावेळी लोणी काळभोर मध्ये दाखल झाली त्यावेळी गावच्या सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच संगीता काळभोर यांनी या बसचे स्वागत केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे व ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.
