पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) उंड्री येथील युरो स्कूलची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच असून विद्यार्थ्यांचे शुल्क न आल्याने त्यांचे परस्पर दाखले देण्याचा प्रताप त्यांनी केला यावर शिक्षण विभागाने कारवाई करत यातील सत्यता पडताळण्यासाठी एक समिती नेमली परंतु शुल्कासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून हमी लिहून घेण्याचा प्रताप या शाळेने केला आहे यावर हे पालक शिक्षण उपसंचालकाकडे गेले असता यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली परंतु पालकांनी त्यावर गुन्हा दाखल करावा असे शिक्षण विभागाने सांगितल्याची माहिती पुढे आलेली आहे.
शिक्षण हक्क कायदा अन्वये कोणत्याही विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचा अधिकार कोणत्याही शाळांना देण्यात आलेला नाही परंतु विद्यार्थ्यांचे शुल्क न मिळाल्याने काही शाळा परस्पर अशा विद्यार्थ्यांना त्यांचे दाखले तयार करून पाठवत आहेत यामुळे या कायद्याचे उल्लंघन करण्याचा हा डाव आहे तर काही ठिकाणी पालकांना याची माहिती विचारण्यास गेल्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की झाल्याचाही गंभीर प्रकार पुढे आला आहे.
काही पालकांनी शुल्क देण्यास तयारी दर्शविल्यानंतर या शाळेने या पालकांकडून हमी लिहून घेण्यासाठी तगादा लावला त्यामुळे अशा या मुजोर शाळेची परवानगी रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्या ऐवजी अगोदर या शाळेवर प्रशासक नेमून त्यानंतर चौकशी पूर्ण करावी व सत्यता समोर आल्यानंतर या शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी पालकांनी केली आहे
यासंदर्भात युरोस्कूल ला कारणे दाखवा नोटीस शिक्षण खात्याकडून बजावण्यात आलेली असली तरीही शालेय प्रशासनात कोणत्याही प्रकारचा फरक पडल्याचे दिसून येत नाही त्यामुळे या शाळेची मान्यता काढून घेण्याच्या प्रक्रिया चौकशीनंतर करण्यात येणार आहे.जे व्यवस्थापन शासकीय आदेशालाही जुमानत नाही अशावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकवर्गाकडून केली आहे.
