पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) टपाल खात्यातून देशात आणि परदेशात कापडी आवरण असलेले पार्सल आता पाठवता येणार नाहीत अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना टपाल कार्यालयाच्या पोस्ट मास्तरांना देण्यात आलेल्या आहेत नुकत्याच कुरियर कंपनीमार्फत पार्सल मधून तलवारी पाठवण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या असून या पार्श्वभूमीवर टपाल कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांना पार्सलची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे

           काही नागरिक कापडाचे आवरण गुंडाळून पार्सल तयार करून टपाल कर्मचाऱ्यांच्या हाती देतात मात्र अशा पद्धतीने पार्सलवर केलेले कापडाचे आवरण यापुढे चालणार नाही कापडी आवरणाचे पार्सल टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांना न स्वीकारण्याचे आदेश टपाल खात्याने दिले आहेत या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे हे आवरण बंद करण्यात आलेले आहे त्या ऐवजी प्रमाणित खोकी वापरण्याचे सांगण्यात आलेले आहे.
        औरंगाबाद पाठोपाठ पुण्यामध्ये खाजगी कुरियर कंपनीच्या माध्यमातून तलवारी पाठवण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत त्या अनुषंगाने टपाल कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांना पार्सलची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे टपाल खात्याच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाचे मुख्य सरव्यवस्थापक अजय कुमार राॅय यांनी पार्सल बाबत आदेश पारित केलेले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *