पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या स्वच्छतागृहाचे नूतनीकरण व उद्योग भवन 1 च्या छताचे वाटर प्रुफ केल्याच्या बिलाचे पैसे देण्यासाठी बिलाच्या पंधरा टक्के रक्कम रु दोन लाख रुपयाची लाच मागितघल्या प्रकरणी अभियंता व उप अभियंता यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यकारी अभियंता प्रमोद कृष्णराव तुपे व उप अभियंता अरविंद दामोदर फडतरे यांनी स्वच्छतागृहाचे नूतनीकरण व उद्योग भवन 1 वरील छताच्या वाॅटर प्रुफींग केलेल्या बिलाची रक्कम देण्यासाठी ठेकेदाराकडे पंधरा टक्के रक्कम लाच मागितली यावर ठेकेदार यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली त्यावर संबंधित विभागाने याची खातरजमा केल्यावर कार्यकारी अभियंता व उप अभियंता याच्याविरुद्ध स्वारगेट पोलिसात तक्रार दाखल केली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव,अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
गुन्हा दाखल करण्याची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधिक्षक जयमाला पवार यांनी केली तर पुढील तपास उप अधिक्षक सिमा अडनाईक करीत आहेत.
