पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) थेऊर गावाकडे येणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने काल घडलेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला होता तर एक गंभीर जखमी झालेला होता त्या जखमीस ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्याचा काल मध्यरात्री मृत्यू झाला यामुळे या अपघातात दोन जण ठार झालेले आहेत. हा रस्ता दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत असून आजतागायत या रस्त्यावर घडलेल्या अपघातात सहा ते सात जणांनी आपला जीव गमावला असून अनेक जण जायबंदी झालेली आहेत या रस्त्याची दुरावस्था दूर करण्यासाठी प्रशासन व राजकीय इच्छाशक्ती दिसून येत नाही
दुचाकीस्वार खड्डा चुकवताना सरळ टँकर खाली गेला यात एक जण जागीच ठार झाला होता तर दुसरा गंभीर जखमी झालेला होता जखमीस उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान हा व्यक्ती काल मध्यरात्री दगावला. या अपघातानंतर थेऊर व परिसरात केवळ या रस्त्याचा संदर्भातच चर्चा होत असल्याचे दिसून आले नेमकी कोणाची अनास्था आहे हे नागरिकांना कळत नाही परंतु यामध्ये सामान्य नागरिक मात्र भरडला जात असून निष्पाप लोक आपला जीव गमावत आहेत रस्त्याचा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने यावर काय निर्णय होतो यावरच भविष्य ठरलेले असल्याने यावर नेमका निर्णय कधी होणार व रस्ता कधी दुरुस्त होणार याकडे केवळ स्थानिकच नाही ही तर येथे येणाऱ्या भाविकांच्याही नजरा लागून आहेत अष्टविनायक गणपती महामार्ग बहुतेक ठिकाणी पूर्णत्वास आलेले असताना हा मार्ग गेल्या तीन वर्षापासून रखडलेला आहे. युती काळामध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिलेला होता व रस्त्याच्या कामाचे उद्घाटन त्यावेळी मोठ्या थाटात झाले होते लोणीकंद ते थेऊर फाटा या रस्त्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली होती यापैकी केवळ एकच टप्प्यात हे काम झाले आहे तर अन्य दोन टप्पे अपूर्ण आहेत.
अपघात झाल्यानंतर टँकर चालक शिवाजी राघोबा गर्जे मु. पो. जांभळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर हा पळून गेला होता त्यास रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले असून लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात आहे
