थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) येथील पावरहाऊस जवळ खड्डा चुकविण्याच्या नादात दुचाकी व टँकर याच्यात अपघात होऊन यात दुचाकीस्वार ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.अपघातानंतर टँकर चालक पसार झाला.

        अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर  गाव रस्त्यावर गेल्या काही दिवसापासून रस्त्याचे काम होऊ शकत नाही,जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने कोणता खड्डा चुकवायचा हे वाहनचालकास कळत नाही  फाट्यापर्यंतचा संपूर्ण रस्ताच अत्यंत खराब झाला आहे त्यामुळेच यावर अनेक अपघात होत असून निष्पाप बळी जात आहेत आज पुन्हा असाच एक अपघात घडला,थेऊरहून थेऊरफाट्याकडे जाणारा दुचाकीस्वार खड्डा चुकवताना सरळ टॅकरखाली आला व अपघात घडला.यासंदर्भातील माहिती गावच्या पोलीस पाटील रेश्मा संतोष कांबळे यांनी माहिती दिली की, कोलवडी येथील दुचाकी एम एच 25 ए ए 7402 व टँकर एम एच 12 क्यु जी 0327 याच्यात अपघात झाला यात दुचाकीस्वार लक्ष्मण संजय लोंढे वय 22 हा जागीच ठार झाला तर अविनाश सुरेश पवार हा गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी विश्वराज हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले अपघातानंतर टॅकरचा चालक तेथून फरार झाला.
          अपघाताची माहिती मिळताच थेऊर पोलीस चौकीचे पोलीस हवालदार विजय जाधव आपले सहकारी एस पी ओ संतोष गायकवाड, राहुल गायकवाड, आण्णा शेंडगे हे घटनास्थळी धावले व अपघातातील जखमींना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
       पुढील तपास लोणी काळभोर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *