पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) उंड्री भागातील शाळेत गेलेल्या पालकांना प्रवेश शुल्काच्या मुद्द्यावरून अडवणूक करण्यात आली त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत प्रवेश का दिला जात नाही असा जाब शालेय प्रशासनाला विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तेथे त्यांना बाउन्सर कडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर येत आहे या घटनेची चित्रफीत काल दिवसभर समाज माध्यमावर फिरत असल्याचे दिसून आले.

         बिबवेवाडीतील क्लाइन मेमोरियल शाळेत पालकांना धक्काबुक्की झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली त्यानंतर विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा गाजला होता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाउंसर न ठेवण्याचे आदेश दिले होते परंतु या आदेशाला धुडकावून लावत आपलीच मनमानी करण्याचा हा प्रकार  या घटनेतून दिसून येत आहे. शालेय शुल्काबाबत या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकाकडे तक्रारी केल्या होत्या त्या विद्यार्थ्यांना शाळेत मेल द्वारे दाखले पाठविले होते या नंतर पालक शाळेत पोहोचले पालकांना बराच वेळ प्रवेशद्वाराबाहेर थांबवून ठेवण्यात आले, कोणतीही माहिती दिली जात नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला.
        घडलेल्या प्रकारानंतर कोंढवा पोलिस शाळेत तातडीने पोहोचले  व पालकांनीदेखील पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक यांची भेट घेऊन शाळेची रीतसर तक्रार केली दरम्यान शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी शाळेला भेट दिली व शाळेची चूक आढळल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *