थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) शिंदावणे ता. हवेली येथील संत यादव बाबा महाविद्यालयाचे संस्थापक.कै. जनार्दन एकनाथ महाडिक यांचे चिरंजीव कै. दीनानाथ जनार्धन महाडिक यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वड ,पिपंळ,चिंच, करंज, कडुनिंब, अशा जंगली वृक्षांची लागवड संत यादव बाबा महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आली.
      ” संतानी देखील निसर्गाचे महत्त्व आत्मीयतेने वर्णन केले असून, वृक्षांबद्दल अनेक अभंगातून त्यांचे आपल्या जीवनातील स्थान विषद केले आहे. बहरलेला निसर्ग कोणाला आवडणार नाही? पानांची सळसळ, पक्षांचे मधुर गीत, झऱ्यांची खळखळ, धबधब्याचा घन गंभीर नाद, समुद्राच्या लाटांची गाज, निसर्गाचे हे रम्य रूप आपले सगळे दु:ख विसरायला लावते. . म्हणूनच आपण सर्वांनी झाडे लावली पाहिजेत.तसेच ती जोपासली पाहिजेत. सृष्टीच्या या चक्रामध्ये प्राणी आणि वनस्पती यांचे अतूट नाते आहे. दोघं एकमेकांवर अवलंबून आहेत. प्राणी श्वास घेताना ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डाय ऑक्साइड सोडतात तर झाडे कार्बन डाय ऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. अशा तऱ्हेने हवेतील घटकांचे प्रमाण कायम राहते आणि सर्व जीव सुखाने राहतात. कारण आता परिस्थिती बदलली आहे. पृथ्वीचा समतोल बिघडला आहे असे प्रतिपादन सरपंच गणेश महाडिक  यांनी केले.
       यावेळी उपसरपंच सारिका महाडिक, उषा जनार्धन महाडिक .देगावच्या सरपंच  विद्या यादव, शिंदवणे गाव चे मा.सरपंच आण्णा महाडिक, सागर काळभोर, ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, उपस्थित होते .तसेच  शिंदवणे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *