पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) अलिकडच्या काळात माध्यमात अनेक स्थित्यंतरे घडत असताना अनेक संधी बरोबरच आव्हाने देखील उभे असल्याचे दिसून येत आहे यावर एक सुरेख परिसंवाद विश्व संवाद केंद्र पुणे व झुंज प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता यात पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज मान्यवर सहभागी झाले होते.विशेष म्हणजे पुणे शहरालगत उपनगर म्हणून विकसित होत असलेल्या लोणी काळभोर येथे याचे आयोजन करण्यात आले या मागचा हेतू स्पष्ट होता की ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडचणी काय आहेत व त्यावर काय उपाययोजना करता येऊ शकतात यावर केंद्रीत हा कार्यक्रम होता.
यामध्ये दै तरुण भारत चे संपादक किरण शेलार यांनी पत्रकारितेत आजपर्यंत कशी स्थित्यंतर घडली याचा आलेख मांडला अगदी स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते अगदी कोरोना काळापर्यंत काय व कशा घटना घडत गेल्या व आपण एक माध्यम म्हणून कशी भूमिका घेत गेलो हे त्यांनी सांगीतले.पत्रकारितेत अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे संशोधन होय असे त्यांनी सांगीतले.सखोल माहिती मिळवून आपला वाचकवर्ग तयार करण्याची ताकद आपल्या लेखनात यायला पाहिजे मग यासाठी भरपूर वाचन व शोध घेणे आवश्यक आहे.
तर माध्यमांची स्वरुप बदलत गेल्याने आपणास अनेक संधी उपलब्ध झाल्याचे आशिष चांदोरकर व पराग पोतदार यांनी सांगीतले.सध्या वृतपत्राबरोबरच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून समाजातील विविध विषय हाताळण्यात येत आहेत अशावेळी केवळ वलयांकित विषया भोवती गुरफटून न राहता समाजातील तळागाळातील लोकांपर्यंतचे प्रश्न उचलून त्यांना वाचा फोडता आली पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.

या चर्चा सत्राचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार डाॅ संजय तांबट यांनी केले तर या संकल्पनेस मूर्त स्वरूप देण्यासाठी झुंज प्रतिष्ठाण चे अध्यक्ष मल्हार पांडे व विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी कार्यवाहक नितीन देशपांडे यांनी मेहनत घेतली यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांसह राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.प्रास्ताविक सुनिल खेडेकर यांनी केले.
