थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) विक्रम संवत्सराची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा या नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.येथील श्री चिंतामणी गणपती दर्शनासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात देवदर्शन करुन व्हावी यासाठी दुपारनंतर मोठी गर्दी झालेली होती सुरक्षा रक्षकांनी भाविकांना शिस्तीत दर्शन व्हावे यासाठी योग्य नियोजन केले होते.

      अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर येथे चतुर्थीसह वर्षातील मुख्य सणासुदीच्या दिवशी भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.आज पहाटे राजेंद्र आगलावे यांनी विधिवत महापुजा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
      याचे महत्व हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने नवीन वाहने, घरातील उपकरणे विकत घेतली जातात.परंतु यावर्षी महागाईने कळस गाठला असून सर्वसामान्य  जनतेचे कंबरडे मोडले आहे.तरीही शासकीय नोकरदार वर्गाच्या महागाई भत्त्यात सातत्याने होत असलेली वाढ त्यामुळे यावर्गात आनंदाचे वातावरण तयार झालेले दिसून येत आहे.
      संपूर्ण दिवसभर भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेला होता,रांगोळ्या व फुलांनी परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *