थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) देशाच्या सर्वांगीण विकासात प्रत्येक घटकांचा वाटा असतो यात तरुण वर्गाचे वर्चस्व अधिक आहे परंतु वयाच्या उतार वयात वेळ कसा घालवायचा याची जेष्ठ नागरिकांना समस्या आहे.थेऊर येथील विशेषतः वार्ड चार व पाच मधील जेष्ठ नागरिक नायगाव रस्त्यालगत असलेल्या दगडावर बसून तासनतास गप्पा मारताना दिसत आहेत.

      गावात अनेक ठिकाणी पंचायत समिती,आमदार फंड यातून बाक बसविण्यात आले परंतु या जेष्ठांना मात्र दगडावर अवघड ठिकाणी बसण्याची वेळ आहे.विशेष म्हणजे ही जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे मग अशा ठिकाणी या वयस्कांसाठी विरंगुळा केंद्र तयार केले तर त्यांना एकत्र बसता येईल.
       जिल्हा परिषद पंचायत समिती याच्या सहकार्यातून जेष्ठांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी काही उपक्रम असतात त्यामधून यांची ही अडचण दूर होऊ शकते परंतु यासाठी दूरदृष्टीतून विचार व्हायला हवा अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *