पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) राज्य कोरोना संकटातून सावरत असतानाच वार्षिक मुल्यांकन दरात सरासरी पाच टक्के दरवाढ करण्यात आली असून यामध्ये महापालिका क्षेत्रात तब्बल 8. 80 टक्के दरवाढ करण्यात आली राज्यात सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक वाढ पुणे व पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भाग मिळून एकूण 8. 15 टक्के वाढ झाली आहे ही दरवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे.

       राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी काल गुरुवारी एका पत्रकार परिषदेत राज्यातील वार्षिक मूल्यदर  जाहीर केले कोरोना महामारीमुळे 1 एप्रिल 2020 ऐवजी सप्टेंबर 2020 मध्ये रेडिरेकनर दरात वाढ करण्यात आली होती त्यानंतर गेल्या वर्षी प्रमाणेच 2021 – 22 च्या आर्थिक वर्षात रेडीरेकनरच्या दरात बदल करण्यात आले नव्हते.
         राज्यात सरासरी पाच टक्के तर ग्रामीण भागात ही सरासरी 6.96 टक्‍क्‍यापर्यंत आहे. महापालिका क्षेत्राचा विचार करता सर्वाधिक दरवाढ मालेगावात 13. 12 त्याखालोखाल औरंगाबाद 12.38, पिंपरी-चिंचवड 12.36, नाशिक 12.15,लातूर 11.93,पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावात 10.15 इतका मुल्यदर निश्चित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *