पुणे (हवेलीनामा ऑनलाईन)    पुणे येथील शाळेच्या स्वच्छतागृहात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले या घटनेनंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश देण्यात आले असून येणारे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व खाजगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्या बाबत ती सुरू असतील याची खातरजमा करून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल असे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत शुक्रवारी निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

        राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्या संदर्भात धोरण ठरविण्यात आले असल्याचे तसेच शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 65 हजार शाळांपैकी सध्या केवळ 1624 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.  उर्वरित शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पुढील वर्षात टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही बसविण्याचे कारवाई करण्यात येईल यासाठी लागणारा खर्च जिल्हा नियोजन विकास निधी, स्थानिक निधी, सी एस आर फंड, लोकसहभागातून केला जाईल. राज्यातील सर्व शाळांमध्ये विशेषतः मुलींकरता निकोप व समता मूल्य वातावरण निर्माण करावे सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी सखी सावित्री समिती गठीत करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
        या समितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, महिला शिक्षक प्रतिनिधी, समुपदेशक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ महिला प्रतिनिधी आदींचा समावेश असेल तर दर महिन्यात सीसीटीवी फुटेज तपासण्याची जबाबदारी या समितीला देण्यात आली आहे त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास समिती त्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीकडे करेल व तक्रारीचे निवारण होईपर्यंत पाठपुरावा करेल सखी सावित्री समितीचे गठण व नियंत्रणाची जबाबदारी शिक्षण आयुक्तांवर टाकण्यात आली आहे तसेच पोलीस विभागातर्फे पोलीस स्टेशन पातळीवर पोलीस काका व पोलीस दिदी संकल्पना राबवण्यात आली आहे यात पोलीस काका व पोलीस दीदींचे तसेच सखी सावित्री समितीतील महत्त्वांच्या सदस्यांची नावे व त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक शाळेच्या दर्शनी भागावर ठळकपणे दर्शविण्यात येतील राज्यातील आदर्श शाळांमध्ये चांगला स्पर्श वाईट स्पर्श यासंदर्भात विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येईल व त्याची सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसण्यात येतील, अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांना  फोन करून विचारना करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *