थेऊर (हवेलीनामा आॕनलाईन) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते सामाजिक कामात तसेच सार्वजनिक उत्सवात अग्रेसर असणारे अजय मनोहर पवार यांची हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली त्यांना निवडीचे पञ हवेली तालुका राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सागर कांचन यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद काळभोर, गणेश मारुती कुंजीर, सागर राजगुरु, वैभव कुंजीर, प्रदिप वारे उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार यांनी सांगितले की, देशाचे नेते शरद पवार,सुप्रिया सुळे,महाराष्ट्राचे उपमुख्यमंञी अजित पवार,शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवून पक्ष संघटन वाढविण्यासाठी जास्तजास्त युवा कार्यकर्त्यांना पक्षाचे धोरण सांगून पक्षाचे सभासद करुन घेण्यास प्राधान्य देणार असून आगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
