पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) कोरोना काळात अडचणीत आलेल्या उद्योग- व्यापार क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी व या क्षेत्राला उभारी देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अभय योजना जाहीर केली या अंतर्गत दहा हजाराची कराची थकबाकी संपूर्णपणे माफ करण्यात येईल असे जाहीर केले कर थकबाकी बाबत अभय योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली
महाराष्ट्र कर व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड 2022 अशी ही अभय योजना असून वस्तू व सेवा कर अस्तित्वात येण्यापूर्वी विभागातर्फे आकरण्यात येणाऱ्या विविध करा संदर्भातील ही योजना आहे या योजनेअंतर्गत आवश्यक रकमेचा भरणा करण्यासाठी 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत चा कालावधी देण्यात आला आहे.
या विधेयका अंतर्गत ज्या व्यापार्याची थकबाकी एक एप्रिल 22 रोजी दहा लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यापाऱ्यांना अविवादित कर, विवादित कर, शास्ती यांचा वेगवेगळा हिशोब न करता सरसकट एकूण थकबाकी च्या 20 टक्के रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे अशी 20 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित 80 टक्के रक्कम माफ केली जाईल राज्यातील लहान व्यापाऱ्यांना जवळपास 2 लाख 20 हजार प्रकरणांमध्ये या निर्णयाचा फायदा होईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले
