थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) अरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी आपल्यातील सुप्त आजार शोधून त्यावर पारंपरिक आयुर्वेदिक उपचार केले तर याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत नाहीत परंतु सध्या अलिकडे याचे भरपूर पेव फुटले ए दिसतात पण काही जण आपली सामाजिक बांधिलकी जप्त समाज सेवा हे वृत्त अंगीकारकरुण सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार करतात.असेच एक असलेल्या उरुळी कांचन येथील श्री विश्वस्पर्श आयुर्वेदच्या माध्यमातून डाॅ अमोल बनसोडे व डाॅ वृषाली बनसोडे हे दांपत्य मोफत आयुर्वेदिक उपचार देत आहेत.
डाॅ अमोल बनसोडे हे आयुर्वेदिक पंचकर्म यातील एम डी असून डाॅ वृषाली बनसोडे या देखील आयुर्वेदिक स्रिरोग तज्ञ आहेत यांनी अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त हे उपचार व औषधोपचार शिबीर आयोजित केले यात पहिल्याच शिबीरास चाळीस लाभार्थ्यांनी सहभाग घेतला.
आयुर्वेदात साधारणपणे वात, पित्त व कफ यावर उपचार केले जातात.परंतु या शिबिरात मुख्यतः पाठ दुखी,टाच दुखी, गुडगेदुखी,खांदे,मान,चमकीवात,कुरुप, सायटीका या आजारावर उपचार करण्यात येत आहेत. या उपचारात आग्नीकर्म, विध्दकर्म व रक्तमोक्षण याचा समावेश होतो.
हे शिबीर प्रत्येक महिन्यात चतुर्थीस श्री चिंतामणी मंदिरासमोर असलेल्या रामकृपा हाॅल येथे मोफत असणार आहे
