पुणे (हवेलीनामा आॕनलाईन)  ग्राहक हा राजा असून त्यास सेवा पुरविणाऱ्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील व्यापारी अनेक वेळा त्यांची फसवणूक करत असतात अशावेळी या ग्राहकास न्याय मिळावा यासाठी शासनाच्या वतीने ग्राहक मंचाची व्यवस्था केली आहे परंतु न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये अनेक वेळेला दिरंगाई होत असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जुलै 2020 रोजी  ग्राहक कायद्यात अमुलाग्र बदल करून नवीन ग्राहक कायदा तयार केला यामध्ये नवीन बदल सुचविले आहेत त्यानुसार तक्रारदार ग्राहक व प्रतिवादी यांच्यात समेट घडवून देण्यासाठी मध्यस्थीची स्थापना करण्यात आली असून यामुळे ही खटले न्यायालयात जाण्या अगोदर समितीकडून समेट घडवून येणार असल्याने न्यायव्यवस्थेवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होणार आहे असे प्रतिपादन माजी न्यायाधीश डाॅ.संतोष जयस्वाल यांनी केले.ते यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठाणच्या 8 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.यावेळी बाळासाहेब किसन झावरे , माजी प्रबंधक, ग्राहक तक्रार निवारण आयोग , मुंबई व उपनियंत्रक – वैद्य मापन शास्त्र,  मुंबई,  अॅङ आनंद गवळी लेखक व सल्लागार व संस्थापक/ अध्यक्ष व माजी मंत्री सूर्यकांत गवळी व महिला विभागाच्या प्रदेशाध्यक्षा अॅड अनिता गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

        या कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांच्या फोटो पुजनाने झाली त्यानंतर तीन सत्रात कार्यक्रम पार पडले यासाठी प्रतिष्ठाणचे राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.
        वर्धापन दिनानिमित्त यावेळी प्रतिष्ठाणची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली व अस्तित्वात असलेली कार्यकारिणी बरखास्त करुन पुढील वर्षासाठीची नविन कार्यकारिणी घोषित करण्यात आली नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *