थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) वेस्ट झोन सब ज्युनियर मुले आणि मुली राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा 2022 मध्ये महाराष्ट्रातील मुलींच्या बॉक्सिंग संघाला सांघिक विजेतेपद मिळाले असून पुणे येथील आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे बॉक्सिंग क्लबच्या 48 ते 50 किलो वजन गटात सृष्टी विजय जाधव हिने रौप्यपदक तर सोनिया अभिमन्यू सूर्यवंशी हिने 34 ते 36 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले.या स्पर्धा नुकत्याच गुजरात मधील ईका स्टेडियम अहमदाबाद येथे पार पडल्या.

ही कामगिरी बॉक्सिंग असोसिएशनचे सेक्रेटरी मदन वाणी सर ,आंतरराष्ट्रीय आईबा कोच श्री.विजय गुजर, अभिमन्यू सूर्यवंशी , राम जगताप, अमोल सोनवणे,,विशाल गव्हाणे यांचे मार्गदर्शनाखाली केली.
सृष्टी विजय जाधव ही रयत शिक्षण संस्थेच्या साधना इंग्लिश मीडियम स्कूल, हडपसर येथे इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असून तेथील प्रिन्सिपल रोहिणी सुशिर व शिक्षक.अंजना भंडारी व इतर शिक्षकवृंदानी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सृष्टी जाधव ही लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंकित थेऊर पोलीस चौकी येथील पोलीस हवालदार विजय नथू जाधव यांची कन्या असून या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले आहे.

