पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) जमिनीची मोजणी करून देण्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडून पाच हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिरूर येथील भुकरमापकास मंगळवारी रंगेहाथ पकडून त्यास अटक केली आहे.
प्रशांत मोहन कांबळे असे लाच स्वीकारणाऱ्या भुकरमापकाचे नाव याप्र असून याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कांबळे हा शिरूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात भुकरमापक म्हणून काम करतो. रविवारी तक्रारदाराने जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज केला होता. मोजणी करून देतो पण जमिनीची मोजणी करण्यासाठी लोकसेवक याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. यावर लाचलुचपत विभागाने सापळा रचून लोकसेवक शिरूर येथील कार्यालयाच्या परिसरात लाच घेताना पकडले.
हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पुणे येथील सुहास नाडगौडा, यांच्या मार्गदर्शनासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
